| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींमध्ये पारंपरिक वेशभूषेत, वाजत गाजत अमृत कलशामध्ये माती व तांदूळ जमा करण्यात आले. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमधून आलेल्या कलशातील माती एकत्र येऊन तालुक्याचा एक प्रातिनिधिक कलश तयार करुन विधीवत पूजा करुन मिरवणूक बुधवार (दि.11) रोजी काढण्यात आली. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान गाव पातळीवर राबविण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष संजय कर्णिक, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश साळी, माजी सभापती छाया म्हात्रे, दिपाली मुंडये डी. एन. दिघीकर, कक्ष अधिकारी हेमंत माळी, श्रीम. वैष्णवी कळंबास्कर, रमेश मोहिते, नरेश विचारे, योगेश पाटिल,रेणुका पाटिल,नगरपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, न्यू इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी, शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.







