| सुधागड -पाली | वार्ताहर |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या संकल्पनेतून 25 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौड आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन काईंगडे यांनी केले आहे. ही दौड रोज सकाळी 7 ते 7:30 वाजता देऊळवाडा येथून सुरू होईल आणि सिद्धेश्वर ते एकवीस गणपती या मार्गावर चालेल. 14 ऑगस्ट पर्यंत सर्वांनी एकूण 75 किमी अंतर धावून पूर्ण करणे अपेक्षित आहे. या दौडीमध्ये पोलीस तर असणार आहेतच पण त्याबरोबरच तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांनी देखील सहभागी होण्याचे आवाहन काईंगडे यांनी केले आहे.