| पेण | प्रतिनिधी |
2 ऑगस्ट रोजी वडखळ येथे साजरा होणार्या वर्धापदिनानिमित्त पेण तालुक्यात विभाग वाईज आमदार धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले. असून, बैठकींची सुरुवात पेण वाशी येथून सुरु झाली आहे. वाशी येथील बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले. की, 75 वा आपला वर्धापनदिन असा उत्साहात साजरा करु की, तो यादगार व्हायला हवा. पेण तालुक्याकडे याजमान पद असल्याने मोठया संख्येने पेणकरांनी यामध्ये भाग घेउन उपस्थितीचा उच्चांक गाठायचा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम फक्त पक्षाचा नसुन आपल्या कुटुंबाचा आहे. या भावनेने सर्वांनी आपला सहभाग नोंदवायचा आहे. झेंडे लावण्यापासून पार्किंग व्यवस्थेपर्यंत आपण सर्वांनी हिरहिरीने भाग घ्यायचा आहे. दिलेली जबाबदारी प्रमाणिकपणे पार करुन जिल्हयासमोर आर्दश ठेवायचा आहे. या बैठकीसाठी शेकाप चिटणीस संजय डंगर, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर (हरी ओम)म्हात्रे, मा. उपसभापती सुनील गायकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती परशुराम पाटील, सुरेश पाटील, लाल ब्रिगेट तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, नगरसेवक संतोष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शरद पाटील,संदेश ठाकुर, काशिनाथ पाटील, दिलीप पाटील, डॉ. परशुराम म्हात्रे, तरणखोप सरपंच विकास पाटील, सुजीत म्हात्रे, दिव सरपंच विवेक म्हात्रे, संभाजी पाटील, विजय ठाकुर, अशोक मढवी, नरेश पाटील, सचिन ठाकुर, काळेश्री मा. सरपंच महेश ठाकुर, शैलेश पाटील अदींसह वाशी विभागातील शेकडो कार्यकर्ते हजर होते.