आदिवासी ठाकुर समाज संघटनेकडून अमृता भगतचा सत्कार

| नेरळ | वार्ताहर |

आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुका नेहमीच तालुक्यातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्याना प्रोत्साहीत करण्यासाठी प्रयत्नशील असते. कर्जत तालुक्यातील विविध क्षेत्रात खेळाडू नेहमीच अग्रेसर असतात. जागतिक युवा पॉवर लिफ्टिंग चॉपियन शिप 2023 रोमानिया येथे नुकतीच स्पर्धा झाली. या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील शेलू येथील रहिवासी असलेली कु.अमृता ज्ञानेश्वर भगत हिने रौप्य पदक मिळविले आहे. आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुक्याच्या वतीने प्रोत्साहन मिळावे म्हणून अमृताचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुक्याचे अध्यक्ष परशुराम दरवडा,महिला अध्यक्षा व कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती जयवंती हिंदोळा, शेलू ग्रामपंचायत माजी उपसरपंच बुधी दरवडा, शेलू ग्रा.पं.सदस्य अशोक वाघ कर्जत तालुका संघटनेचे सहसचिव गणेश पारधी संघटनेचे सल्लागार सुनील पारधी, दत्तात्रेय हिंदोळा, मनोहर दरवडा, सोमा निरगुड़ा, हिरू निरगुड़ा संघटनेचे विभाग प्रमुख राजु पिरकड, मनोहर ढुमणा आदी उपस्थित होते.

Exit mobile version