अमृत 2.0 अतंर्गत धरण पुनर्जीवित

मुरुडकरांना मिळणार गारंबी, सवतकड्याचे पाणी

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

नवाब कालाळापासून मुरुड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गारंबी धरण व सवतकडा धरण या मूळ योजना होत्या. परंतु मुरुड शहर पर्यटन स्थळ असल्याने पाण्याला मागणी वाढली म्हणून खारआंबोळी येथे मोठे धरण बांधण्यात आले आणि शहराला मुबलक पाणीपुरवठा सुरु झाला. त्यामुळे गारंबी व सवतकडा धरणातील पाण्याचा वापर कमी झाला आणि या धरणाकडे दुर्लक्ष झाले.

खरतर ह्या धरणाच्या पाण्यासाठी कोणतेही वीज पंप वापरावे लागत नाही. त्यामुळे पालिकेचा खर्च कमी होतो. त्याउलट खारआंबोळी धरणातील पाण्यासाठी दोन मोठे पंप वापरले जातात त्याचे बिल लाखात येत असल्याने पालिकेचा खर्च वाढतो, म्हणून पालिकेने शासनाच्या अमृत 2.0 योनानेअतंर्गत गारंबी व सवतकडा पाणीपुरोवठा योजना पुनर्जीवित करण्याचे ठरले आहे. या अंतर्गत धरणातील गाळ काढणे, धरणातील पाणी गळती थांबवणे व धरणातून शहराला नवीन पाईप लाईन टाकणे हि कामे होणार आहेत.

जांभा दगडावरून वाहून येणारे शुद्ध पाणी मिळते. अशा पाण्याला खूप दिवस मुरुडकर दुरावले होते. आता पालिकेच्या अमृत 2.0 योजनेअतंर्गत गारंबी धरण पुनर्जीवित झाल्यावर वर्षातील आठ महिने गारंबी धरणाचे शुद्ध पाणी मुरुडकरांना प्यायला मिळणार आहे. उरलेले चार महिने खारआंबोळी धरणाचा वापर होणार होता.

मुरुड गारंबी धरणातील पाणी म्हणजे अमृत आहे, मुरुडकरांना कायम तेच पाणी पिण्यासाठी मिळावे अशी योजना राबवा. पावसाळ्यात परिसर पर्यटकांनी बहरलेला असतो. येथे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

आदेश दांडेकर, समाजसेवक

गारंबी व सवतकडा पाणीपुरवठा योजना शासनाच्या अमृत 2.0 योनानेअतंर्गत कामाचा आढावा घेऊन अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सुरु आहेशासनाची मंजुरी झाल्यावर निविदा होऊन कामाला सुरवात 6 महिन्यात होईल.

पंकज भुसे, मुख्याधिकारी
Exit mobile version