| श्रीवर्धन | वार्ताहर |
25 डिसेंबर हा स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, महाड येथे दोन दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन कोमसाप रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अजित जंगम, स्नेहा गांधी, गंगाधर साळवी, संध्या केळकर, पोटफोडे, गो.ल.कांबळे महाअंनिस जिल्हा उपाध्यक्ष प्रा दीपक क्षीरसागर, अनंत कांबळे, राज्य महिला कार्यवाह आरती नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गायकवाड, प्रधान सचिव सिद्धेश गोसावी, तनुश्री, मनोहर तांडेल, महेंद्र नाईक, जेसिका आ.म.,अमिलेश हे उपस्थित होते.