काटरंग परिसरात साकारतेय आकर्षक उद्यान

मुख्याधिकारी अनुप दुरेंनी केली पाहणी

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली नगरपालिका हद्दीतील काटरंग गावाच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात आ. महेंद्र थोरवे यांच्या आमदार निधीतून तसेच स्थानिक माजी नगरसेविका अर्चना संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून आकर्षक उद्यान साकारण्यात येणार आहे. या कामाची पाहणी प्रशासक, मुख्याधिकारी अनुप दुरे आणि संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी नुकतीच केली.

खोपोलीत सुसज्ज मैदान नसल्यामुळे बाहेरील शहारात मॅच खेळण्यासाठी गेल्यावर तेथील मैदान आणि खेळाडूंसाठी असलेली व्यवस्था पाहून सर्व खेळाडूंना खूप दु:ख व्हायचे. तर शहरात मैदान नसतानाही इंटरनॅशनल शाळांचे कोच आपल्या गावातील आहेत, त्यामुळेच खोपोली शहरात आऊटडोअर मल्टिपरपज स्पोर्ट्स कोर्ट्स तयार करण्याची पाठपुरावा करीत काटरंग परिसरात बास्केटबॉल कम बॅडमिंटन स्पोर्ट्स कोर्ट मागील वर्षी तयार करून लोकार्पण केले आहे. तर काटरंग परिसरात मोठ मोठ्या इमारती उभारल्यामुळे लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील अबालवृद्धांना आपल्या हक्काचे उद्यान असावं यासाठी 10 हजार स्क्वेअर फुटांचे 32 लाख रुपये खर्च करून उद्दान उभारलं जाणार आहे.

Exit mobile version