| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील उडदवणे गावचे सुपुत्र तथा सर्पमित्र अमेय कराळे व दीपक कोल्हकर यांनी आठ फुटी नाग सापाला जीवदान दिले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मुठवली खु. येथील रस्त्याच्या बाजूला गवतामध्ये दडून बसलेला साप ग्रामस्थांनी पाहिला. याबाबत येथील युवा कार्यकर्ते महेश तुपकर यांनी सर्पमित्र अमेय कराळे व दीपक कोल्हकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर या दोघांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या शिताफीने सापाला सुरक्षितपणे पकडून दूर जंगल भागात सोडून दिले. सर्पमित्र अमेय कराळे व दीपक कोल्हकर यांच्या धाडसाचे कौतुक करून ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद दिले.