परप्रांतीयाकडून वृद्ध दाम्पत्याला मारहाण

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

गेट समोर वाहन उभ करू नका आणि येथे मद्यपान करू नका, असे सांगितल्याने मराठी दांपत्याला परप्रांतीय वाहन चालकाने आणि त्याच्या सहकार्यांनी मारहाण केल्याची घटना कळंबोली येथील रोडपाली परिसरात घडली आहे. घटनेनंतर परिसरात गर्दी जमल्याने मारहाण करणारा वाहन चालक वाहन तिथेच सोडून पसार झाला असून, कळंबोली पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रोडपाली परिसरात अवजड वाहने उभी करून तेथेच चालक मद्यपान करतात. मद्यपान करून झालेल्या वादातून हत्या झाल्याची घटना या पूर्वी या परिसरात घडली आहे. तसेच, अपघातामुळे लहान वाहन चालकांना जीव गमावण्याची घटना देखील या पूर्वी घडली आहे. रोडपाली परिसरातील नागरिकांनी या विरोधात पंतप्रधान कार्यालयाशी तसेच पत्रव्यव्हार केला आहे. प्रशासनांकडे लेखी पत्रव्यवहार केला होता. सेक्टर 14 ते 20 या परिसरातील रहिवाशी या अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे हैराण आहेत. सिडको प्रशासनाच्या मोकळ्या भूखंडावर आणि रस्त्यालगत अवजड वाहने उभी केलेली असतात. पोलीस दिखाव्यापुरती तात्पुरती कारवाई करतात. मात्र, येथे कायमस्वरूपी तोडगा प्रशासन काढू शकलेली नाही. रणचिर फुलचंद सहारे हे 67 वर्षीय ग्रहस्थ आपल्या पत्नी सोबत रोडपाली परिसरात छोटासा व्यवसाय करतात. बुधवारी (दि.31) घडलेल्या घटनेनुसार सहारे आणि त्यांच्या पत्नी व्यवसाय बंद करून सामानाची आवरा आवर करत असताना समोर उभ्या असलेल्या अवजड वाहनाचा चालक आणि त्याचे सहकारी वाहनात बसून मद्यपान करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी मद्यपान करून बाटल्या येथे टाकू नका, असा जाब सहारे यांच्या पत्नीने विचारल्याने याचा राग येऊन चालक आणि त्याच्या सहकार्याणी लाथा बुक्याने त्यांना मारहाण केली असून घटना स्थळावरून पसार झाले आहेत.

Exit mobile version