मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक! गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
उज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे उज्वला योजनेतील 10 कोटी ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे आता उज्वला योजनेंतर्गत असलेल्या नागरिकांना आता फक्त 600 रूपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, उज्वला योजनेंतर्गत 300 रूपये गॅस सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे आता सिलेंडर आता 600 रूपयांना मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. केंद्र सरकारने याआधी 29 ऑगस्टला महत्त्वाची घोषणा केली होती. त्यावेळी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी केले होते.

Exit mobile version