प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा उपक्रम

बेरोजगारांसाठी मोफत प्रशिक्षण

| सोगाव | वार्ताहर |

वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढत्या बेरोजगारांची ही संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे नोकऱ्या मिळणे ही दुरापास्त होऊन बसले आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने उपक्रम हाती घेतला असून, फाऊंडेशन तर्फे संचलित अलिबाग तालुक्यातील झिराड येथे उन्नती बहुकौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरु केले असून, या केंद्रात बेरोजगार युवक, युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेत रोजगाराच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नतीही साधली आहे. या संस्थेच्या माध्यमातून आठवी पास पासून पुढील शिक्षण घेतलेल्या व बेरोजगार असलेल्याना, तसेच ब्युटीशिनसाठी दहावी पास असलेल्या व 18 ते 35 वय असलेल्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हाऊस किपिंगसाठी आठवी पास व 18 ते 35 वय असलेल्यांना प्रशिक्षण देत आहे, तसेच फूड अँड बेव्हरेजसाठी आठवी पास 18 ते 35 वय असलेल्यांना प्रशिक्षण देत आहे. यासोबतच शिवणकामासाठी आठवी पास व 18 ते 45 वय असलेल्यांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

प्रशिक्षणासाठी संस्थेच्या वतीने अनुभवी शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक, सुसज्ज शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षणादरम्यान इंग्रजी संभाषण संगणक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण, प्रशिक्षणानंतर प्रथम व एनएसडीसी द्वारा प्रमाणपत्र, प्रशिक्षणानंतर लगेचच रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, तसेच प्रशिक्षण कालावधीत मुलांसाठी जेवण व वसतिगृहाची ही विशेष मोफत सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, उन्नती बहुकौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र झिराड अलिबाग, मोबाईल नंबर- 7066995153, 8466885153 येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version