| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पाली-खोपोली राज्य महामार्गालगत वऱ्हाड जांभुळपाडा नदीच्या लहान पुलाच्या नदी पात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. हा मृतदेह कुणाचा ही ओळख अद्याप पटली नाही. काही दिवसांपूर्वी सुधागडात एका वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर नदी पात्रात हा मृतदेह सापडल्याने नागरिकांत चर्चेचा विषय ठरला आहे.
सकाळी नागरिकांनी पाली व जांभुळपाडा दूरक्षेत्रातील पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले व मृतदेह बाहेर काढून त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी सदर मृतदेह पुरुषाचा असून, त्याची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती दिली. पुढील पोलीस तपास सुरू असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पो.नि. शेरेकर यांनी केले.
अंबा नदी पात्रात अनोळखी मृतदेह
