| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील शिरवणे गावात एक अनोळखी मृतदेह आढळून आला. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसल्याने गावात खळबळ उडाली. त्याची हत्या झाली कि तो पडून त्याचा मृत्यू झाला याबाबत नेरुळ पोलीस तपास करीत आहेत. अंगावर निळी आकाशी जीन्स अंगावर टी शर्ट आहे. मृतदेहाबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त भुजबळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केला आहे. त्याच्या आसपास रक्त दिसत असल्याने त्याची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, सीसीटीव्हीची पाहणी केली असता पहाटे तो एकटाच पायी जात असताना अचानक तोल गेल्या प्रमाणे मागे मागे आला आणि पडला. तेथेच तो निपचित पडला. त्यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हते. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. त्याने मद्य वा अन्य अमली पदार्थ प्राशन केले होते कि नाही हे वैद्यकीय अहवालात स्पष्ट होईल. अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डहाणे यांनी दिली.