। इंदापुर । प्रतिनिधी ।
माणगांव तालुक्यातील इंदापुर येथील नवजीवन विद्यामंदिर हायस्कुल तसेच कै.ग.द.तटकरे कनिष्ठ महाविद्याल, तळाशेत येथे मंगळवारी (दि.2) सायंकाळी 6.00 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरूने हायस्कुल व महाविद्यालयाच्या परिसरात घुसून एकूण 15 लाख रूपयांचे नुकसान केले.
सविस्तर वृत्त असे की, नवजीवन विद्यामंदिर तसेच कै.द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्याल तळाशेत हे इंदापुर शहरापासून काही अतंराच्या हाकेवर असून हे हायस्कुल व महाविद्याल मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता बंद झाल्यानंतर एक अज्ञात माथेफिरूने महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश केला. तसेच सात रूमचे लाँक तोडून 10 लाख रूपये किमतीचे साहित्य असलेल्या विज्ञान शाळेची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नासधूस केली. याच विज्ञान शाळेचे गेल्या महिनाभरात आ. आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तसेच हा माथेफिरूने एवढयावरच न थांबता संस्थेच्या कार्यालयात घुसून कागदपञे, फर्निचरची देखील तोडफोड केली.
हा सर्व प्रकार या परिसरातील काही नागरिकांनी बघितल्याने त्यांनी या हायस्कुलच्या शिक्षकांना तातडीने सांगितले. यावेळी नवजीवन विद्यामंदिर हायस्कुलचे मुख्यद्यापक तसेच शिक्षक, हायस्कुलमधील कर्मचारी तसेच इंदापुर विभाग शिक्षण प्रसारक मंडळचे उपाध्यक्ष चंद्रकांत राऊत, सचिव अविनाश मांडवकर, दिपकशेठ जाधव, उदय अधिकारी, समिर मेहता, बाळा खातू, मनोज जैन, नितिन घोणो तसेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून माथेफिरूला पोलिसांनी अटक केली.