| पनवेल | वार्ताहर |
रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचे सचिव व करंजाडे पोलीस पाटील कुणाल लोंढे यांच्या चार चाकी गाडीची मागील काच अज्ञात इसमाने फोडल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री सदर गाडीची पाठीमागील काच अज्ञात इसमाने फोडली असून, सर्व सामाजिक क्षेत्रातून तसेच महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध केला जात आहे. सदर पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे,