| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर शहरात सेक्टर 34 सी मधील पालिकेच्या भूखंड क्रमांक 37 वर अज्ञात व्यक्तीने पाच झाडांची कत्तल केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रहिवासी अॅड. संदीप खाकसे यांनी याबाबत पालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाने शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पालिकेचे उपायुक्त स्वरूप खरगे यांच्याकडे याबाबत तक्रार प्राप्त होताच त्यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाचे प्रमुख संदीप पवार यांना पाहणी करण्याच्या सूचना केल्यानंतर त्यांनी संबंधित झाडांचा पंचनामा केला आहे. खारघरमध्ये वृक्ष कत्तलीचे प्रकार सुरू असून, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खाकसे यांनी केला आहे.






