| पनवेल | वार्ताहर |
अज्ञात वाहनाने स्कुटीला धडक दिल्याने यात 26 वर्षीय रोहित राजेश निर्मल याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेणधर येथे राहणारा रोहित निर्मल हा मित्रांसमवेत बाहेर फिरण्यासाठी स्कुटी घेऊन गेला होता. रात्री बाराच्या सुमारास रोहितचा मित्र सचिन याने घरी येऊन रोहितचा अपघात झाला असल्याचे सांगितले. रोहित स्कुटी घेऊन नावडे फाट्याकडून तळोजा एमआयडीसी कडे जात असताना ब्रिजवर आला. यावेळी अज्ञात वाहनाने त्याच्या स्कुटीला धडक मारली. यात रोहित जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वैद्यकीय मदत न करता पळून गेला आहे.





