जातीचा दाखला मिळण्याकामी रोह्यात उसळली कुणबीलाट

हजारोंच्या संख्येने उपस्थित बांधवांनी दिले निवेदन


| खांब/कोलाड | वार्ताहर |

जातीच्या दाखला मिळण्याकामी असणाऱ्या जाचक अटी रद्द करून समाजाचा जातीचा दाखला मिळावा या मागणीसाठी गुरुवार, दि.14 रोजी कुणबी समाजाची प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. यावेळी उपस्थित समाजबांधवांकडून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई व जिल्हा जिल्हा समन्वय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका कुणबी समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. जि.समन्वय अध्यक्ष ज्ञानदेव पवार, शंकर म्हसकर, शिवराम शिंदे, शिवराम महाबळे, शंकर भगत, सुरेश मगर, अनंत थिटे, रोहिदास दुसार, दिनेश राटाटे, सुहास खरीवले, दत्ताराम झोलगे, गोफिनाथ गंभे, मारुती खांडेकर, रामचंद्र चितळकर, पांडुरंग बाईत, रामचंद्र सकपाळ, मुंबई शाखा युवक अध्यक्ष शरद गंभे, उपाध्यक्ष सुनील ठाकूर, बाबू इप्ते मंगेश सानप, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन कदम, महेश बामुगडे, मंगेश देवकर, शशिकांत कडू, संजय मांडुलसकर, विकास खांडेकर, रमण कापसे, अमित मोहिते, प्रमोद जांभेकर, संतोष भोईर, गजानन बामणे, संतोष देवळे,हिराजी शिंदे,राजेंद्र खिरिट, अमोल शिंगरे, रवींद्र अहिरे आदी प्रमुखांसह सर्व विभागांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने समाजबांधव व भगिनी तसेच युवक उपस्थित होते.

रोहा तालुक्याच्या इतिहासात न भूतो न भविष्यती मोर्चा काढून साऱ्याच तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या मोर्चासाठी संपूर्ण तालुक्यातील खेड्यापाड्यातील व दुर्गम भागात राहणारे हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव व भगिनी तसेच युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून आपल्या समाजाची एकजूट दाखवून दिली. अतिशय शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून कुणबी समाजाने प्रांताधिकारी व तहसीलदारांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. या मोर्चाचे व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश भगत व अरूण आगळे यांनी केले.

Exit mobile version