। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथील आनंदीबाई कृष्णा मुंबईकर यांचे 14 नोव्हेंबर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले आहे. निधनासमयी त्या 97 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्योगपती अनिल मुंबईकर यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पुत्र अनिल मुंबईकर, पांडुरंग मुंबईकर, रवींद्र मुंबईकर, नातू भावेश मुंबईकर, कन्या कुसुम पाटील, विमल म्हात्रे, शोभा आपटे, सुना, जावई, नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शनिवारी (दि.23) श्रीक्षेत्र चिरनेर खाडी येथे सकाळी 8.30 वाजता होणार आहेत. तर, उत्तरकार्य विधी सोमवारी (दि.25) चिरनेर मुळपाडा येथील राहत्या घरी दुपारी 12 वाजता होणार असल्याची माहिती मुंबईकर कुटुंबियांकडून देण्यात आली.
अनिल मुंबईकर यांना मातृशोक
