। रसायनी । वार्ताहर ।
जागतिक पर्यावरण परिषद निमित्त राष्ट्रीय नागरी व पर्यांवरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यावतीने समाजात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना गौरविण्यात आले. यावेळी नविन पोसरी मोहोपाडा येथील अनंत महाराज कार्ले यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार म्हणून राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ह.भप.अनंत महाराज कार्ले यांची सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यांवरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल राष्ट्रीय नागरी व आंतरराष्ट्रीय संस्थेने घेऊन अनंत महाराज कार्ले यांना केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्थेचे विजयराजे ढमाळ, मदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.







