| अलिबाग | प्रतिनिधी |
इंडिया आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गिते यांनी अलिबाग शहरातील मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे, काँग्रेस नेते सुकुमार भगत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख अमीर तथा पिंट्या ठाकूर, प्रकाश राठोड, माजी नगरसेविका तनुजा पेरेकर, माजी गटनेते प्रदीप नाईक, माजी नगरसेविका नईमा सय्यद, संजना कीर, प्रिया वेलकर, ठाकरे गटाचे अलिबाग शिवसेना शहर प्रमुख संदीप पालकर आदी उपस्थित होते.
यावेळी अनंत गीते यांनी सांगितले की, लोकसभा मतदार संघात मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. लोकं उस्फुर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत. लोकांमध्ये महायुतीच्या विरोधात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. यावेळी मतदानाच्या टक्क्यात वाढ होईल आणि फायदा आपल्याला होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.