अनंत महाराजांची उद्या पुण्यतिथी

| महाड | प्रतिनिधी |
श्री सद्गुरू अनंत महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सोमवार दि. 27 मार्च रोजी साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 ते 12 श्री सद्गुरू अनंत महाराज यांची मिरवणूक, यानंतर दुपारी 12 ते 2.30 समाधी दर्शन व महाप्रसाद, सायं. 5.30 ते 6.30 हरिपाठ, रात्री 9.30 ते 11 भजन आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती श्री अनंत महाराज उत्सव कमिटी, नाते महिला मंडळ व तरूण मंडळ, नाते व श्री अनंत महाराज विद्यालय नाते व ग्रामस्थ यांनी दिली आहे.

Exit mobile version