अनंता हाके यांचे निधन

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते अनंता कुशाबा हाके (59) यांचे गुरुवार, दि.20 जानेवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक विवाहित मुलगा, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पी.एस.आय. शंकर हाके यांचे मोठे भाऊ होते. अनंता हाके धनगर समाजाचे मूनवली येथील प्रतिष्ठित नागरिक म्हणून पंचक्रोशीत ओळखले जात होते. ते आर.सी.एफ.कारखान्यात कंत्राटी कामगार होते. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी मित्रपरिवार, मुनवली ग्रामस्थ, हाके परिवारातील नातेवाईक, आप्तेष्ट आदी उपस्थित होते. अनंता हाके यांचा दशक्रिया विधी रविवार, दि. 30 जानेवारी मुनवली स्मशानभूमीत होणार आहे, तसेच तेरावा मंगळवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी मुनवली येथील राहत्या घरी होणार आहे.

Exit mobile version