| उरण | प्रतिनिधी ।
उरण हे बेट असून या बेटावर अनेक पुरातनकालीन गोष्टी आहेत, ज्याचा शोध घेणे आवश्यक आहे. उरणचा पश्चिम किनारासुद्धा या गोष्टीला अपवाद नसून या समुद्रकिनाऱ्यावर हिंदू बांधवांची श्रद्धा असणारा “श्रीमतपरमहंस श्रीजीवन्मुक्तस्वामी महाराज” यांचा आश्रम आहे, तर किनाऱ्यावर मुस्लीमबांधवांचे श्रद्धास्थान असणारा “हजरत सैय्यद मुकीमशाह कादरी” यांचा दर्गा आहे. मागीणदेवीचे देवस्थान आहे. आणि याच किनाऱ्यावर ओएनजीसीचा प्रकल्प आहे. वर उल्लेख केलेली दोन्ही तीर्थक्षेत्र ही इतिहासाची साक्ष आहेत, आशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पिरवाडीच्या समुद्रकिनाऱ्यावर काही अज्ञातव्यक्तीने समुद्रात टाकून दिलेल्या सुभक कलाकृतीने पाषाणात कोरलेल्या हिंदूदेवदेवतांच्या मूर्ती सापडल्याने काही पर्यटकांनि सदरच्या मूर्ती किनाऱ्यावर आणून ठेवल्या असल्याने भाविकांमध्ये श्रद्धेची भावनानिर्माण झाली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार सदरच्या मूर्ती उरण–पिरवाडी सागरकिनार पट्टीवर स्थानिक रहिवाशांच्या मुलांना दिसल्या. त्यांनी सदरची महिती शिवराज युवा प्रतिष्टान यांना याची महिती दिली असता शिवराज युवा प्रतिष्टानच्या सदस्यांनी सदरजागेवर जाऊन पाहाणी केली असता श्रीगणेश, श्री मारुतीराया व देवी देवतांच्या पाषाणी मूर्ती दिसल्या. युवा प्रतिष्टानचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाई ठाकूर व इतिहासाचे अभ्यासक जकांत शिक्रे, गड सवर्धन प्रमुख गणेश माळीक, मार्गदर्शक गणेश भोईर यांच्या मार्गदर्शना खाली मोहीम प्रमुख यज्ञेश म्हात्रे, राजा नाईक, रवी म्हात्रे, कौशिक म्हात्रे, रोहित भोईर, पंकज पाटील, देवेंद्र पाटील सुशील कदम, दौलत पाटील यानी त्या पिरवाडीच्या समुद्र किनाऱ्यावर आणल्या आहेत.
सदर नजरेस आलेल्या मूर्ती यांचा इतिहास अभ्यासक यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तींचा इतिहास व ऐतिहासिक महत्वजाणून घेऊनत्यावर संशोधन व अभ्यास करून संदर्भासहितय मूर्तींचा इतिहास “शिवराज युवा प्रतिष्टानच्या” माध्यमांतून नागरीकांसमोर मांडण्यात येईल, तो पर्यंत नगरीकांनी प्रतीक्षा करावी भावनिक होऊन कोणतेही भवनीक विधान करू नये.
संदेश भाई ठाकूर
संस्थापक अध्यक्ष, शिवराज युवा प्रतिष्टान