आणिबाणीतील स्वातंत्र्यसैनिक मानधनाविना

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथील स्वातंत्र्य सैनिक गोविंद गणू पाटील यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक हे शासनाकडून मिळणार्‍या लाभ आणि आणीबाणी मानधनापासून वंचित असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधत विशेष उल्लेखाद्वारे सर्व लाभार्थ्यांना मानधन देण्याची मागणी केली आहे.

आ. जयंत पाटील यांनी आपल्या विशेष उल्लेखात म्हटले आहे की, सन 1975 ते 1977 मधील आणीबाणी कालावधीत लोकशाही करीता लढा देणार्‍या ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याबाबतचे धोरणांतर्गत शासनाकडून आणीबाणी मानधन देण्यात येते. परंतु श्री. गोविंद गणू पाटील, रा. चिंचवटी, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्यासह इतर लाभार्थी असणार्‍या व्यक्तींना आणीबाणी मानधन उपलब्ध करण्यात यावे असा प्रस्ताव जिल्हाधिकारी रायगड यांनी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सादर करण्यात आलेला आहे. परंतु अद्यापही सदर मानधन लाभार्थ्यांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे गोविंद गणू पाटील, रा. चिंचवटी, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्यासह इतर लाभार्थी आणीबाणी मानधन देण्यात यावे अशी मागणी आ पाटील यांनी विशेष उल्लेखाद्वारे केली आहे.

Exit mobile version