। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील रोडपाली येथे इमारतीचे काम सुरु असताना 19 व्या मजल्यावरून कामगार खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. रोडपाली सेक्टर 17 येथे असलेल्या या इमारतीत कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा पुरविण्यात आली नसल्याने ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच कामगार आयुक्तालयातील अधिकार्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्याची आणि घटनेची चौकशी केली असल्याची माहिती अधिकार्यांकडून देण्यात आली आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यवस्थ झालेल्या कामगारला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कामगार आयुक्तालय माहिती घेऊन पुढील कार्यवाही करणार आहे. दरम्यान, दुर्घटना घडलेल्या इमारतीत घटनेप्रसंगी उपस्थित असणार्या कामगारांकडून घटनेबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उपस्थितांनी अधिक माहिती देणे टाळल्याने घटनेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अन् क्षणात तो 19 व्या मजल्यावरुन खाली पडला
