..अन्‌‍ दुर्घटना टळली

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषक 2024 मध्ये बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात एक विचित्र घटना घडली. नाणेफेक जिंकल्यानंतर नेदरलँड्सने बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान, डच संघाचा व्हिव्हियन किंग्मा गोलंदाजी करत असताना त्याचा एक चेंडू बांगलादेशचा सलामीवीर तनजीद हसनच्या हेल्मेटच्या ग्रिलमध्ये जाऊन अडकला. या बाऊन्सर चेंडूवर फलंदाजाला दुखापत होऊ शकली असती, मात्र हेल्मेटच्या ग्रीलमुळे मोठी दुर्घटना टळली.

बांगलादेशच्या डावाच्या तिसऱ्या षटकात ही घटना घडली, जेव्हा विवियन किंग्मा डच संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी आला होता. किंग्माने षटकातील पहिल्या 4 चेंडूत 14 धावा दिल्या होत्या, परंतु त्याच दरम्यान त्याने पाचव्या चेंडूवर बाउन्सर टाकला. ताशी 134 किमी वेगाने येणाऱ्या बाउन्सर चेंडूवर पुल शॉटसाठी तनजीदने बॅट फिरवली, पण चेंडू त्याच्या हेल्मेटच्या ग्रिलमध्ये जाऊन अडकला.

Exit mobile version