अँडरसनच्या पुनरागमनाचे संकेत

। लंडन । वृत्तसंस्था ।

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे त्याने क्रिकेटलाच अलविदा केले असल्याचे म्हटले जात होते, कारण तो गेल्या काही काळात मर्यादीत षटकांचे क्रिकेट खेळला नव्हता. मात्र, आता तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या विचारात आहे.

42 वर्षीय अँडरसनने लॉर्ड्सवर जुलैमध्ये वेस्ट इंडिजमध्ये शेवटची कसोटी खेळली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत 188 कसोटीत 704 बळी घेतले आहेत. दरम्यान, आता अँडरसनने सांगितले की, कारकिर्द संपली असं म्हणण्यासाठी कदाचीत मी नकार देईन. कारण मला हे चांगलं माहित आहे की मी पुन्हा इंग्लंडकडून खेळणार नाही, पण मी अद्याप माझ्या क्रिकेट कारकिर्दीबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.

पुढे अँडरसन म्हणाला, यापूर्वी मी कधीही फ्रँचायझी क्रिकेट खेळलेलो नाही. यावर्षी ‘द हंड्रेड’ पाहिले, त्यांचे चेंडू स्विंग होताना पाहिले. मला ते बघून असं वाटलं की मी गोलंदाजी करू शकतो. हा हंगाम संपला की मी एकदा नीट विचार करेन आणि ठरवेन की मला पुढच्या वर्षात क्रिकेट खेळायचे आहे की नाही. मी शेवटच्या क्षणी कोणत्याही प्रकारचे क्रिकेटसाठी तयार आहे. मी अजूनही खेळण्यासाठी फिट आहे.

Exit mobile version