रेवदंडा कुस्ती स्पर्धेत आंदोशी आखाडा प्रथम

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा येथ दीपावलीत लक्ष्मीपुजनाचे निमित्ताने आयोजित पारंपारिक कुस्ती स्पर्धेत आंदोशी आखाडा क्रमांकाचा विजेता ठरला, तर व्दितीय क्रमांक वाडगाव आखाडा व तृतीय क्रमांक मांडवा या आखाड्याने पटकाविला.

श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ रेवदंडा-चौल आयोजीत कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ अलिबाग कुस्ती संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र भगत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. प्रसंगी शेकाप अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदीप घरत यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष सुरेश खोत, उपाध्यक्ष शरद वरसोलकर, चिटणीस हेमंत गणपत, सदस्य मधूकर फुंडे, सुभाष शेळके, महेश ठाकूर आदी उपस्थित होते.

स्पर्धेस माजी आ.पंडित पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कुस्ती स्पर्धेत एकूण दहा आखाडे सहभागी झाले होते, तर एकूण 65 कुस्त्या घेण्यात आल्या, यामध्ये दहा गुणांनी आंदोशी आखाडा प्रथम क्रमांक, नऊ गुणांनी वाडगाव आखाडा व्दितीय, तर आठ गुणांनी मांडवा आखाडा तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकास उस्ताद इनुस तांडेल यांचे स्मरणार्थ खलिल युनूस तांडेल यांचेकडून चषक बक्षिसे ठेवण्यात आले होते. स्पर्धेत वासुदेव पाटील-आंदोशी, वैभव मुकादम-बेलोशी, रविंद्र घासे-नवगाव, प्रमोद भगत-आवास सुधाकर पाटील-आंदोशी, यांनी पंचाचे काम पाहिले तर राजेंद्र नाईक सर यांनी कुस्ती स्पर्धेचे सुत्रसंचलन केले.

Exit mobile version