कणकवलीत अनामत वीज बिलांमुळे संताप

। कणकवली । वृत्तसंस्था ।
गेल्या काही वर्षांपासून वीज बिलामध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हातात वीज बिलाबरोबर अनामत रक्कम भरणा करण्यासाठी बिल दिले जात असल्याने ग्राहक संतप्त आहे. त्यामुळे येत्या काळात अतिरिक्त वीज बिल ग्राहकांच्या माथी मारल्यास ते भरणार नाही, असा इशारा भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवाीर दिला. येथील कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते-पाटील यांच्याशी भाजपच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. अतिरिक्त अनामत वीज बिले वितरण कंपनीला परत केली आहेत. तालुक्यातील वीज ग्राहकांना अनामत रक्कम भरणा करण्यासाठी अतिरिक्त वीज बिले दिली आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ग्राहकांनी अनामत रक्कम भरणा केलेली असताना त्यांना अतिरिक्त बिल का दिले जाते? असा सवाल भाजपच्या शिष्टमंडळाने केला. वीज बिलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिभार लावले जात आहेत.

वीज ग्राहकांच्या वापरानुसार दर महिन्याचे वार्षिक सरासरी अंदाजे बिल काढले जाते. ज्यांचे वीज वापराचे युनिट अधिक आहेत. अशा सरासरी वीज बिलावर अनामत रक्कम निश्‍चित केली जाते. त्यामुळे ही रक्कम नियमानुसार महावितरणकडे सुरक्षित ठेवली जाते. त्यावर व्याजही दिले जाते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला त्याच्या वापरानुसार अनामत रक्कम भरणा करणे अनिवार्य आहे. बाळासाहेब मोहिते-पाटील, कार्यकारी अभियंता, महावितरण

Exit mobile version