सुधागडात आंदोलकांची संतप्त घोषणाबाजी

विद्यार्थ्यांवरील लाठी चार्जचा जाहीर निषेध; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यांच्या आवाहनाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. सुधागड तालुक्यातही गुरूवारी (दि.23) बंद शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. तसेच, पाली, परळी आणि पेडली येथील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारी, नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला समर्थन दर्शविले.

पेपरफुटी प्रकरण, शैक्षणिक व्यवस्थेतील गैरप्रकार आणि दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यांच्या आवाहनाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. या बंदमध्ये अनेक संघटना, संस्था, राजकीय पक्ष, विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी असोसिएशन, बहुजनवादी, लोकशाहीवादी व समताविचारांचे नागरिक सहभागी झाले होते. सुधागड तालुक्यातही बंद शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी पणे पार पडला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यादरम्यान, हातात तिरंगा ध्वज घेऊन “भारतीय संविधानाचा विजय असो, लोकशाही जिंदाबाद” असे म्हणत “अरे या शिक्षणमंत्र्याचं करायच काय? खाली डोकं वर पाय”, अशी घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी व्यापारी वर्गानेही स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. यादरम्यान, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडला नसून, बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक राहुल गायकवाड, उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, अशोक वाघमारे, नारायण जाधव, स्वप्नील गायकवाड, आनंद जाधव, ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाअध्यक्ष संदेश भालेराव, आवेश भालेराव, राजेश गायकवाड, नितिन गायकवाड, ओबिसी नेते ॲड. प्रवीण कुंभार यांच्यासह उदय धुमाळ, सुनील साठे, भावेश गायकवाड, नितेश गायकवाड, दिपक गायकवाड, निशांत गायकवाड, ॲड. सुशिल गायकवाड, अक्षय भालेराव, चेतन भालेराव स्वप्नील कदम, विनोद कदम, चंद्रकांत जगताप, मयूर गायकवाड, संतोष गायकवाड, दामोदर जाधव, भीमसेन गायकवाड, निवास सोनावले, नितिन वाघमारे, राकेश, शिर्के, प्रशांत जाधव, प्रशांत गायकवाड आणि प्रशांत गायकवाड आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version