| मुंबई | प्रतिनिधी |
रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतरांविरोधात ईडीनं 2929 कोटी बँक फ्रॉड केसमध्ये नवा गुन्हा दाखल केला आहे. यामुळं अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ईडीकडून ही कारवाई गेल्या महिन्यात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या अहवालावर आधारित आहे. सीबीआयनं स्टेट बँक ऑफ इंडियाला झालेल्या नुकसानासाठी अनिल अंबानी, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतरांना जबाबदार ठरवलं आहे. याप्रकरणी सीबीआयनं अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. पहिल्यांदा अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधात सीबीआयनं 2929 कोटी रुपयांच्या बँक फ्रॉडचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अनिल अंबानी प्रसिद्धीपत्रक जारी करत आरोप फेटाळले होते. कंपनीच्या प्रवक्त्यांनी त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्यचं म्हटलं. याशिवाय त्यांनी आणखी एक दावा केली स्टेट बँकेकडून करण्यात आलेली तक्रार दहा वर्षे जुन्या प्रकरणाशी संबंधित आहे.







