। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात राहावे लागणार असून त्यांची रवानगी ऑर्थर रोड किंवा इतर तुरुंगात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे सादर करणार नसल्याचे म्हटले आहे.