। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथील गुरूकुल व्यायामशाळेतर्फेजिल्हास्तरीय खुल्या गुरुकुल श्री 2022 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कोप्रोलीचा अनिल वामन म्हात्रे गुरुकुल श्री 2022 किताबचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील तीस स्पर्धकांनी भाग घेतला होता.
अलिबाग क्रीडाभवन येथील गुरूकुल व्यायामशाळेतर्फे क्षात्रैक्य समाज हॉल कुरूळ येथे रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने गुरूकुल श्री 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागाव सरपंच निखिल मयेकर, डॉ. राजेंद्र चांदोरकर, अमिर ठाकूर व आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन संतोष साखरे, प्रितम सुतार यांनी केले.
बेस्ट पोझर रायगड हेल्थ सेंटर कोप्रोली येथील जितेंद्र पाटील तर बेस्ट बॉडी मसल म्हणून प्रसाद सुतार यांची निवड निवड करण्यात आली. ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली. पहिल्या गटात प्रथम क्रमांक मयेकर तर ऋृषिकेश म्हात्रे दुसरा क्रमांक पटकाविला. दिनेश चालके, अलिबागचा दिवेश करे, प्रणय मुंडकर यांनी अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकाविला. दुसर्या गटात प्रथम क्रमांक अजित म्हात्रे याने पटकावला तर दिपक राऊळ याने दुसरा क्रमांक पटकाविला. अमर म्हात्रे, अनंता भोईर, अजय मेहता यांनी अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकाविला.तिसस्या गटात प्रथम क्रमांक विशाल बानकर याने तर संकेत वर्तक याने दुसरा क्रमांक पटकाविला. प्रणव पुजारी, संयोग पाटील, विराज वारगे यांनी अनुक्रमे तिसरा,चौथा व पाचवा क्रमांक पटकाविला.चौथ्या गटात प्रथम क्रमांक प्रसाद सुबार तर जिनेंद्र पाटील याने दुसरा क्रमांक पटकाविला. तन्मय पायल,संदीप कोबळी, सागर बळी यांनी अनुक्रमे तिसरा,चौथा व पाचवा क्रमांक पटकाविला.