अनिल म्हात्रे यांचे निधन

| उरण | वार्ताहर |

चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल भास्कर म्हात्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (दि.17) निधन झाले आहे. निधना समयी त्यांचे वय 54 वर्षे होते. त्यांनी पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे दिले. त्यानंतर त्यांनी उरण तालुक्यातील खोपटा, चिरनेर, पाणजे, मुळेखंड शाळेवर शिक्षक म्हणून काम पाहिले. यांना 2014-15 साली रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. खोपटा गावातील स्मशानभूमीत त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Exit mobile version