अनिल नवगणेंच्या प्रचाराचा नारळ फुटला

धावीर महाराजांचे दर्शन घेऊन प्रचार सुरू

| म्हसळा | वार्ताहर |

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मतदान वीस दिवसांवर येऊन ठेपले आहे. यादरम्यान म्हसळा शहराचे ग्रामदैवत धावीर महाराजांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल नवगणे यांनी दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. याप्रसंगी श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेचा विश्‍वास आणि शरद पवार राष्ट्रवादीने दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याची भावना नवगणे यांनी व्यक्त केली.

शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असताना श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेच्या मनात विश्‍वास निर्माण केला असून, त्याची पावती जनता मतदानरुपी आशीर्वादातून देणार आहे. मात्र, भगवंतांची कृपा, साधुसंतांचे आशीर्वाद घेणे आपली संस्कृती आहे. आगामी काळात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आय, कुटुंबीय, मित्रपरिवार आदी मिळून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढू, असे ते म्हणाले. यावेळी शहरप्रमुख विशाल सायकर, ज्येष्ठ शिवसैनिक अनंत नाक्ती, उपतालुका प्रमुख हेमंत नाक्ती, अभय कळमकर, अंकुश नटे, राहुल जैन, नदीम दफेदार, शिवा आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version