| पनवेल | प्रतिनिधी |
नुकत्याच पार पडलेल्या पनवेल तालुक्यातील वाघिवली ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने सात पैकी सहा जागी विजय मिळवून विजयाची परंपरा कायम ठेवली. या निवडणूकीत थेट सरपंचपदी अनिल बाळाराम पाटील हे भरघोस मतांनी निवडून आले. त्यांनी भाजपचे शैलेश गोमा पाटील यांचा पराभव केला.
या सर्व विजयी सरपंच आणि सदस्यांचे शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालय पनवेल या ठिकाणी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ घरत, करंजाडेचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी अभिनंदन केले. तसेच नवनिर्वाचित सरपंच अनिल पाटील, नवनिर्वाचित सदस्य प्रितम रामदास भगत, रोशनी महेश गावंड, रश्मिता विशाल पाटील, रुद्राक्षा जयेंद्र पाटील, कृष्णा परशुराम भोईर, निशा अतिश मुंडकर यांचा सत्कार केला.
पनवेल तालुक्यातील वाघिवली ग्रामपंचायत ही पूर्वीपासूनच शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. यावेळी या ग्रामपंचायतीची जबाबदारी रामेश्वर आंग्रे आणि प्रमोद भगत यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी विशेष मेहनत घेऊन सत्ता संपादन केली.