अनिल पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

। अलिबाग । प्रतिनिधी ।
सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबागमधून सिव्हील असिस्टंट इंजिनीअर या पदावरुन निवृत्त झालेले, आंबेपूर-पेझारी येथील अनिल पाटील यांचा सेवानिवृत्ती व षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा बुधवारी (5 जानेवारी) श्रीगाव येथे साजरा करण्यात आला. अनिल पाटील हे हरहुन्नरी गायक असून भजन-वादन यांच्यात ते पारंगत आहेत. त्यांच्या स्वप्नाली पाटील यांचे महिला भजन मंडळही आहे. या वाढदिवस प्रसंगी, चांगुबाई पाटील, परशुराम पाटील, विनोद पाटील, प्रताप पाटील, शांताबाई पाटील, सविता पाटील, ओमकार पाटील,स्मिता ठाकूर, संपदा कटरे, जावई इतर कुटंबिय पांडुरंग पाटील, प्रकाश म्हात्रे, जी.सी. पाटील, सुरेश पाटील, मोहन मनचुके, के.डी. म्हात्रे, डॉ. अनिल बांगर, मुकुंद म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, संतान पाटील, रामचंद्र म्हात्रे, आर.जे. पाटील, डी.एम. पाटील, श्रीकांत पाटील, रमेश पाटील, परशुराम पाटील, संतोष म्हात्रे, संजय पाटील, कमलाकर पाटील, शैलेंद्र भगत, उमाजी केळुसकर आदी उपस्थित होते. संतोष वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. रोहित पाटील, शैलेंद्र भगत, राजेंद्र म्हात्रे, संतोष म्हात्रे, संतोष ल्हासे, प्रशांत झाडेकर आदींनी आपल्या गायनाने हा वाढदिवस संगीतमय केला.

Exit mobile version