लांब उडीमध्ये अनिष्का सावंत प्रथम

| खारेपाट | वार्ताहर |

समाज कल्याण विभाग रा.जि.प. अलिबाग व डॉ. नंदकुमार मा. जाधव फाऊडेशन न्यु पनवेल यांच्या संयुक्त विद्यमान रायगड जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत लांब उड्डीमध्ये राजमाता जिजाऊ विद्यालय अलिबाग येथील विद्यार्थिनी अनिष्का योगेश सावंत हिने प्रथम क्रमांक पटकविला.

6 ते 12 वयोगटात सदर स्पर्धा के.आ. बांढिया विद्यालय क्रीडांगण, पनवेल येथे दि.3 रोजी पार पडल्या. या यशाबद्दल अनिष्का सावंत हिचे विद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले, तसेच अलिबाग मुरुड फोटोग्रॉफर असोसिएशन अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच विविध स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version