अनिता आनंद कॅनडाच्या संरक्षणमंत्री

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय वंशाच्या कॅनडाच्या नेत्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिता आनंद यांना मंगळवारी कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर आनंद यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जस्टिन ट्रूडो यांचा लिबरल पक्ष महिनाभरापूर्वी सरकारमध्ये आला आहे. दीर्घकाळ पंतप्रधानपदी राहणार्‍या ट्रूडो यांच्या पक्षाला मात्र बहुमत मिळू शकलेले नाही.

Exit mobile version