अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयास; शंभर टक्के अनुदान मंजूर

। मुरुड। वार्ताहर।
मुरुड शहरातील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयास शंभर टक्के अनुदान मंजूर झाले आहे. महाविद्यालयास युनिव्हर्सिटीच्या नॅक मूल्यकनात ब दर्जा सुद्धा प्राप्त झाला आहे. सदरील महाविद्यालयाची सन 2009 मध्ये विना अनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आली होती.तेव्हापासून हे महाविद्यालय शासकीय नियम पाळून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शासनाच्या प्रारूप आराखड्यात जाहिरात प्रसिद्ध करून अनुदानासाठी रीतसर अर्ज मागवण्यात आले होते.त्याप्रमाणे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.28 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होऊन सदरील महाविद्यालयास शंभर टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच शासन अध्यादेश निर्गमित करण्यात येऊन शंभर टक्के अनुदान मंजूर अधिकृतरित्या मंजूर करण्यात आले आहे.


शंभर टक्के अनुदान मिळण्यासाठी अध्यक्ष इरफान शहा, हिफजू रहेमान नाजिरी, रहीम कबले,खजिनदार अल्ताफ मलिक, अजीम खानजादा, जैनुद्दीन कादरी,सदस्य इम्रान मलीक,इस्माईल शेख,तौसिफ़ फत्ते, प्राचार्य साजीद शेख, माजी प्राचार्य ड. शरद फुलारी, आदींनी अथक परिश्रम घेतले आहेत.

Exit mobile version