अंकिता, कौरने गाठला ऑलिम्पिक कोटा

। अंतल्या । वृत्तसंस्था ।

रविवारी अंकिताने फिलीपिन्सच्या गॅब्रिएल मोनिका बिदौरचा पराभव करून अंतिम ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यासोबतच ती पुढील महिन्यात होणार्‍या पॅरिस ऑलिम्पिकसाठी महिला गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

नवव्या मानांकित अंकिताने उपउपांत्यपूर्व फेरीत 40व्या मानांकित गेब्रियलवर 6-0 (26-23, 28-22, 28-23) असा विजय मिळवला. तत्पूर्वी, अंकिताने इस्रायलच्या शेली हिल्टनचा 6-4 (24-26, 25-25, 28-20, 25-25, 27-25) आणि मिकाएला मोसेसचा 7-3 (28-25, 25-27, 27-27) असा पराभव केला. 28-25, 26-25) आणि अंतिम 16 मध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे, भारताची तिसरी मानांकित महिला तिरंदाज भजन कौर हिने रविवारी देदीप्यमान कामगिरी केली. तिने जागतिक पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीतील महिलांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. याचसोबत तिने भारताला ऑलिंपिक कोटाही मिळवून दिला आहे. भजन कौर हिने अंतिम फेरीच्या लढतीत इराणच्या मोबिना फल्लाह हिच्यावर 6-2 असा विजय संपादन केला. त्यामुळे भारताला वैयक्तिक प्रकारात कोटा मिळवता आला. भारतीय पुरुष आणि महिला संघांना अंतिम ऑलिम्पिक पात्रता फेरीतून कोटा मिळवता आला नाही. पण जर दोन्ही संघांनी जागतिक क्रमवारी कायम ठेवली तर ते 24 जूनच्या अंतिम मुदतीपर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवू शकतात.

दीपिकाला कोटा मिळाला नाही
तत्पूर्वी, भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारीला प्राथमिक फेरीत अझरबैजानच्या यायागुल रमाझानोव्हाकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. द्वितीय मानांकित दीपिकाचा अझरबैजानच्या तिरंदाजाने 6-4 (26-28, 25-27, 23-26, 24-25, 27-29) असा पराभव केला.
Exit mobile version