| पेण | प्रतिनिधी |
जिल्हयातील ज्येष्ठ पत्रकार दशरथ कृष्णा वैरागी तथा अण्णा वैरागी वयाच्या 94 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. 1959 ते 1999 पर्यंत 40 वर्ष नवशक्तीसाठी त्यांनी काम केले. त्यांनी दै.केसरी, दै.तरुण भारत, दै. विशाल सहयाद्री, दै. महाराष्ट्र टाईम्स, दै. सामना, दै. रत्नागिरी टाईम्स अदि वृत्त पत्रांमध्ये वार्ताहर म्हणून काम केले. तर मार्मिक व चित्रलेखा या नियत कालीकांमध्ये त्यांनी बरेचसे लेखन केले. आकाशवाणीच्या मुंबई व रत्नागिरी केद्रांवर वेगवेगळया विषयांची 50 व्याख्याने गाजली, तर मुंबई दुरदर्शन केंद्रावर त्यांनी घेतलेल्या मुलाखाती विशेष गाजल्या. महाराष्ट्र शासनाच्या कोकण पत्रकारांच्या अधिस्विकृती समितीवर पाच वर्ष काम केले. त्यांनी तालुका रोजगार हमीचे अध्यक्षपद, तालुका समन्वय सदस्य, महात्मा गांधी वाचनालयाचे सचिव, पेण एज्युकेशन सोसायटीचे संचालक यांच्यासह अनेक पद भुषविली. जिल्हा पत्रकार संघाने 19 जुलै रोजी त्यांना रायगड पत्र भूषण पुरस्कार देउन सन्मानित केले. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. त्यांच्यावर अत्यंसंस्कार पेण येथील विश्वेश्वर स्मशान भूमीत करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.







