मराठा भूषण पुरस्कार उद्योजक रामचंद्र ढोबळे यांना प्रदान
। पनवेल । वार्ताहर ।
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीच्यावतीने 4 था वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मराठा समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे उद्योजक रामचंद्र ढोबळे यांना मराठा समाजाचे रायगड जिल्हा समन्वयक रामदास शेवाळे व विनोद साबळे यांच्या शुभहस्ते मराठा भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला खांदा कॉलनी सह पनवेल परिसरातील सामाजिक क्षेत्रात काम करणार्या मंडळीनी हजेरी लावली. मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी मंडळाच्या कार्याची तसेच संस्थेने समाजहितासाठी सुरु केलेल्या संस्थेच्या वेबसाईटची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सकल मराठा समाज मंडळाच्या या उपक्रमामुळे समाज बांधणीच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलल्याचे समाधान कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना मंडळाचे सचिव सदानंद शिर्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले.







