शनिवारी पनवेलमध्ये वर्धापन दिन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सुशील वाघमारे यांचे आवाहन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा (उत्तर) यांच्या विद्यमाने प्रथम वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथील भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र येथे शनिवारी (दि.4) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा सोहळा जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला जाणार आहे.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख एस. के. भंडारे, राष्ट्रीय सचिव बी. एच गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमा पवार, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी भिकाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु. जी. बोराडे, महिला कमिटी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष स्वाती शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते दिपक मोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ॲड. कैलास मोरे, जयवंत लव्हाडे, दिपक गायकवाड, उषा कांबळे, आनंद गायकवाड, ॲड. हेमंत शिंदे आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील रायगड महिला व पुरुष कार्यकारिणी, शहरी ग्रामीण भागातील तालुका, विभाग, ग्राम, वार्ड शाखेतील पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौध्दाचार्य, माजी श्रामणेर, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, जवान, उपासक उपासिका सर्वांनी मेोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा शाखा अध्यक्ष सुशील वाघमारे यांनी केले आहे.

Exit mobile version