हाशिवरे हितवर्धक मंडळाचा वर्धापनदिन

| अलिबाग | वार्ताहर |

हाशिवरे हितवर्धक मंडळ संस्थेचा 76 वा वर्धापन दिन बुधवारी (दि.7) महात्मा गांधी व कनिष्ठ महाविद्यालयांमधील श्री स्वामी समर्थ सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर ईशस्तवन व स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार शैलेश मोकल यांनी संस्थेचा इतिहास सांगून केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अनुप म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य घडवण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले. बी जी शिकारे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून शाळेतील विविध उपक्रमांचा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख सांगितला.

या कार्यक्रमासाठी हाशिवरे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र मोकल, उपाध्यक्ष सरोज डाकी, सचिव ज्ञानेश्वर मोकल, अनिल मोकल, सुबोध मोकल, निशिकांत मोकल, माजी प्राचार्य रामनाथ कडवे, वैजाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला पाटील, शालिनी प्रकाश मोकल, हर्षद कशाळकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विकास गावंड, सदानंद पाटील, बी डी गायकवाड , ऋतुजा पाटील, प्रतिभा पाटील, प्रज्ञा धसाडे तसेच महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वैजाळी प्राथमिक शाळा व इंग्रजी माध्यम सर्व सेवकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना ठाकूर, स्मिता मोरे, कामिनी ठाकूर, श्री कोळी यांनी केले. माजी प्राचार्य कडवे यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version