| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील पेझारी गावातीलवरची आळी येथे चौलचे नाथसिध्द स्व. नारायण वार्डे गुरूजी व श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हाप्रमुख श्री दिगंबर राणे यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या श्री कानिफनाथ मंदिराचा 11 वा वर्धापनदिन उत्सव गुरूवार (दि.4) रोजी आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त वरची आळी पेझारी येथील कानिफनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार 4 मे रोजी सकाळी 6 वाजता अभिषेक व पूजा, 7 वाजता नवनाथांच्या पोथीतील 12 व्या अध्यायाचे वाचन, 8 वाजता श्रीसत्यनारायणाची महापूजा, दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसाद, दुपारी 4 वाजता कानिफनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरूवात होईल. रात्री 8 वाजता नवनाथांच्या आरतीने पालखी परिक्रमेचा समारोप, असे कार्यक्रम साजरे होणार आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी या कानिफनाथ मंदिराच्या वर्धापनदिन उत्सवास उपस्थित राहून आनंद लुटावा असे आवाहन पाटील कुटुंबीय श्री कान्होबा आस्तान उत्सव समिती पेझारी (वरची आळी), ता. अलिबाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.