कुंभार समाजाचा वर्धापनदिन उत्साहात

| चिरनेर | वार्ताहर |

नवीमुंबई कुंभार समाज मंडळाचा अकरावा वर्धापन दिन सोहळा नुकताच नवी मुंबई येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेश कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी भूषविले होते. वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुंकू सोहळा, कुंभार भूषण पुरस्कार सोहळा, वधू वर सूचक मेळावा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रसिका खेडेकर, महेश सायकर, वसंत घोडनदीकर, बाळासाहेब कुंभार, पांडुरंग कुंभार, गजानन चौलकर, यशवंत शेंदुळकर, अजय विरकर, अमोल केंबुलकर, शशिकांत चांदेकर, गंगाधर देवडे, अनंत महाडकर, भास्कर कल्याणकर, शरद खारकर, रामजी प्रजापति, नंदकुमार चिरनेरकर, रमाकांत गोरे, जितेंद्र पाभरेकर, राम पान्हेरकर यशवंत अष्टेकर, दिनेश बिरवाडकर, स्वप्निल केंबुलकर, विष्णू चौलकर, चेतन चौलकर, पंढरीनाथ मांडलेकर, प्रसाद चौलकर, दीपक गोरे उत्तम कोळंबेकर, शिवाजी भागवत तसेच महिला पदाधिकारी मीना चौलकर, प्रतिभा वाडेकर, अप्रिता कुंभार, प्रणाली लाड, नीलम चौलकर, भारती मांडलेकर, रोशनी चौलकर, अर्चना शिर्के, सविता गोरे, संपदा देवडे, आशा चांदेकर, गीतांजली उकिडे, वनिता गडदे आदींची उपस्थित होते.

Exit mobile version