राज्यस्तरीय युवा संपादक, जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
। अलिबाग । वार्ताहर ।
पत्रकारांच्या सामाजिक बांधीलकी जपणार्या रायगड प्रेस क्लबचा 16 व्या वर्धापन दिन सोहळा माणगाव येथे शुक्रवार, दि. 22 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त राज्यस्तरीय युवा संपादक आणि जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. हा सोहळा कुणबी भवन, निजामपुर रोड, माणगाव येथे सकाळी 11 वाजता पार पडणार आहे.
या सोहळ्यात राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार आणि जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. भरत गोगावले, माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माणगाव उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, ज्येष्ठ माध्यमकर्मी समीरण वाळवेकर, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, मराठी पत्रकार परिषद कोकण विभाग सचिव विजय मोकल, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या समारंभप्रसंगी आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार- अजित वरपे (संपादक दैनिक झुंजार नेता बीड), जीवन गौरव पुरस्कार – विजय मांडे (कर्जत), स्व. निशीकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती जेष्ठ पत्रकार पुरस्कार – मेघराज जाधव (मुरूड), उदयकुमार कळस (म्हसळा), स्व. प्रकाश काटदरे स्मृती निर्भिड पत्रकार पुरस्कार – प्रफुल पवार (अलिबाग), सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार- संजय (आप्पा) द्वारकानाथ ढवळे, चंद्रशेखर (बाबुशेठ) रावसाहेब खानविलकर, आरोग्यसेवा पुरस्कार – डॉ. इस्माईल हुसेन रहाटविलकर, यशस्वी मराठी उद्योजक पुरस्कार – संतोष नारायण वरपे, दीपक श्रीराम जाधव, डॉ. संजय राजाराम सोनावणे, स्व. संतोष पवार स्मृती युवा पत्रकार पुरस्कार – हरेश मोरे (साई-माणगाव), सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता पुरस्कार – सीमा मोरे (पोलादपूर), उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार – प्रकाश माळी (पेण), प्रसाद पाटील (महाड), श्रमिक पुरस्कार – आनंद पवार (रसायनी), संतोष शिलकर (श्रीवर्धन), एस. टी. पाटील (खालापूर), नंदकुमार मरवडे (रोहा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.







