। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा आठवा वर्धापनदिन सोहळा सोमवारी (दि.18) मोठ्या उत्साहात व धार्मिकतेच्या वातावरणात संपन्न झाला.
स्वा. सु. अलिबागकर, धोंडू कोलाटकर व गोपाळ वाजे यांच्या कृपार्शिर्वादाने व दत्तू महाराज कोलाटकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी देवतांचे अभिषेक व पूजाविधी, कलश स्थापना, ध्वजारोहण व महाआरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 9 व 12 व्या अध्यायाचे पारायण, सामुदायिक हरिपाठ, सायं. 7 ते 9 रूपेश शेळके यांची हरिकिर्तनरुपी सेवा, तद्नंतर महाप्रसाद, महाओजन व हरिजागर आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ तळवली तर्फे अष्टमी व जय हनुमान क्रीडा मंडळ तळवली यांनी मोलाचे सहकार्य केले.